श्री खंडोबाचे मैलारपूर ( नळदुर्ग ) मध्ये आगमन , आता पावणे दोन महिने मैलारपूर (नळदुर्ग ) मध्ये मुक्काम ...

खंडेराया कसा डोलतो !

वाघ्याच्या तिमडीवर
मुरळी नाचते,
हलगीच्या तालावर
वारू नाचतो,
अन
बघा माझा खंडेराया
कसा डोलतो !

कोरस
बघा माझा खंडेराया
कसा डोलतो,
कसा डोलतो
बघा डोलतो !
....
नळदुर्गाच्या किल्ल्यामंधी
देव प्रगटला
नळ दमयंतीने
त्याला पूजीयेला
बोरी नदीच्या काठावर
नगारा कसा वाजतो
बघा माझा खंडेराया
कसा डोलतो
......
दमयंतीच्या भक्तीसाठी
देव नळदुर्गात आला,
बानूशी लगीन करून
जेजुरीकडे निघाला !
समदा नळदुर्गवासी
घोड्यासमोर नाचतो
बघा माझा खंडेराया
कसा डोलतो !
----
कधी अणदूरात
कधी नळदुर्गात
देवा तुझी दोन रूपं
दिसती कशी छान
पौष पौर्णिमेला
यात्रा मोठी भरली
सोन्याच्या रंगाने
समदी कशी माखली
यात्रेमंधी भक्त
काठी नाचवतो
बघा माझा खंडेराया
कसा डोलतो

- सुनील ढेपे
......
वरील खंडोबा गीतावर चाल सुचवा , बक्षीस मिळवा
आपला आवाज चांगला वाटला तर आपल्याच आवाजात गीत रेकॉर्ड करण्यात येईल ...
सुनील ढेपे
9420477111